Post views: counter

Current Affairs March 2015 Part - 4

चालू  घडामोडी मार्च २०१५
current affairs

  • २०१५ पर्यत ऑस्ट्रेलियाने एकूण कितव्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे?
== ५ वेळेस
  1. १९८७-अॅलन बोर्डर 
  2. १९९९-स्टीव्ह वॉ
  3. २००३-२००७-रिकी पाँटिंग
  4. २०१५-मायकल क्लार्क
  •  इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा विजेते:-
>महिला एकेरी-सायना नेहवाल,उपविजेती-रॅचनॉक इन्टॅनन-थायलंड
>पुरुष एकेरी-के. श्रीकांत,उपविजेता-व्हिक्टर अॅक्सेलसन-डेन्मार्क
  • केंद्र सरकार पुरस्कृत सर्व योजनांचे प्रभावी संचलन करण्यासाठी तसेच, त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी 'निति आयोगा'तर्फे विशेष समितीची स्थापना करणार आहे.ही समिती कोणाच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
== निति आयोगाच्या सीईओ सिंधुश्री खुल्लर
  • हैदराबाद फंड वादात पाकिस्तानचे वर्तन अनुचित असल्याचे सांगून भारताला एक कोटी ३९ लाख रुपये देण्याचा आदेश पाकिस्तानला कोणी दिला आहे?
== लंडन कोर्टाने
>वादात भारत, द नॅशनल वेस्टमिन्स्टर बँक आणि निजामाचे उत्तराधिकारी मुकर्रम जाह व मुफ्फखम जाह यांचा समावेश.
>२० सप्टेंबर १९४८ मध्ये तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या अर्थमंत्र्यांकडून नऊ कोटी ३९ लाख रुपये पाकिस्तानचे तत्कालीन उच्चायुक्त हबीब इब्राहिम रहिमतुल्ला यांच्या वेस्टमिन्स्टर बँकेतील खात्यात जमा.
  • मिझोरामचे राज्यपालपदावरून हटविण्यात आलेले राज्यपाल कोण?
== अझिझ कुरेशी
>बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे मिझोरामच्या राज्यपालपदाचा तात्पुरता कार्यभार सोपवला आहे
  • सरकारने देशातील प्रमुख अशा किती  बंदरांनजीक अत्याधुनिक शहरे (स्मार्ट सिटीज्) विकसित करण्याचे ठरविले असून या बंदरांना रेल्वेमार्गांनी जोडण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे?
== १२
  • १०) केंद्र सरकारने अतिरिक्त राष्ट्रीय जलमार्गांसाठी निवडलेल्या १०१ नद्यांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या नद्यांचा समावेश करण्यात आला आहे?
== अंबा, अरुणावती, मांजरा (महाराष्ट्र-कर्नाटक-तेलंगण), नागनदी, पैनगंगा, सावित्री, शास्त्री नदी (जयगड) आणि उल्हास

  • १२) प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या 'एफबीबी फेमिना मिस इंडिया २०१५' पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे?
== अदिती आर्या
  • ढाकामध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी लेखक अविजीत रॉय यांच्यावर शस्त्रास्त्रांनी वार करत हत्या करण्यात आली होती,यानंतर पुन्हा राजधानी ढाकामध्ये आणखी कोणत्या ब्लॉगरची हत्या करण्यात आली?
== वशीकुर रहमान
  • इबोला या घातक संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीची मनुष्यावर करण्यात आलेली पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरली आहे.ही लस  कोणत्या दोन संस्थानी मिळून विकसित केली आहे?
== बीजिंग इन्स्टिटय़ूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि तिनांजिन कॅनसिनो बायोटेक्नॉलॉजी
  • भारताच्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दोन एअरबस ३३० विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली असून या विमानांची किंमत किती कोटी रुपये इतकी असणार आहे?
==  ५ हजार १०० कोटी रुपये
>भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून १ हजार ६०५ कोटी रुपयांचे स्वाती हे रडार खरेदी प्रस्तावाला ही मंजुरी
>एअरबोर्न वॉìनग अँड कंट्रोल सिस्टीम (एवॅक्स)

  • सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती-स्वातंत्र्याच्या मूलभूत मूल्यापुढं बाकीच्या गोष्टी दुय्यम असल्याचा निर्वाळा कोणत्या खटल्यात दिला होता?
== १९५० मध्ये रोमेश थापर विरुद्ध मद्रास राज्य खटल्यात,
>वृत्तपत्र पृष्ठसंख्या आणि किंमतप्रकरणी १९६२ मध्ये सकाळ पेपर्सनं दाखल केलेल्या याचिकेत,
>१९७३ च्या बेनेट अँड कोलमन आणि १९८५ च्या इंडियन एक्‍स्प्रेस खटल्या

  • पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता अत्यावश्यक करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
== राजस्थान
  • घुमान मराठी साहित्य संमेलनाची मुख्य संयोजक संस्था कोणती आहे.जीने घुमान हे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी केली आहे?
== सरहद(पुणे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा