Post views: counter

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती : चुनखडी

महाराष्ट्र खनिज साधनसंपत्ती:
महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

चुनखडी :
बांधकामात जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडकापासुन तयार केला जातो. महाराष्ट्रात चुनखडीचे फक्त दोन टक्के साठे आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्य़ात आढळतात.

  • यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्य़ात चुनखडीचे सर्वात जास्त साठे आढळतात. याशिवाय धुळे, नंदुरबार, नांदेड, इ. ठिकाणीही चुनखडीचे साठे आढळतात. मात्र हे साठे कनिष्ठ दर्जाचे आहेत.
  • चंद्रपूर - या जिल्ह्य़ात बरोडा व नाजोरा तालुक्यात चुनखडीचे साठे आढळतात.

डोलोमाइट:
याचा उपयोग प्रामुख्याने लोहपोलाद निर्मितीसाठी तसेच खत कारखान्यात केला जातो. डोलोमाइट व डोलोमाइटयुक्त चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्य़ांत आढळतात. याशिवाय रत्नागिरी व नागपूर जिल्ह्य़ांतही थोडे साठे आढळतात. भारतातील डोलोमाइटच्या एकूण साठय़ांपकी एक टक्का साठा महाराष्ट्रात आढळतो.
कायनाइट व सिलीमनाइट हिऱ्यांना पलू पाडण्याच्या उद्योगात तसेच काचकाम रसायन उद्योग, सिंमेट उद्योग यामध्ये उपयोग केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा